घरताज्या घडामोडीराहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात सावरकरांच्या जन्मभूमीत कडकडीत बंद

राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात सावरकरांच्या जन्मभूमीत कडकडीत बंद

Subscribe

कॉग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'वेळी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राहुल गांधीच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. अशातच राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

कॉग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’वेळी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राहुल गांधीच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. अशातच राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. भगूरमधील बाजारपेठा आणि इतर सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहेत. बंद पुकारण्याआधी नाशिक जिल्ह्यातील भगूर या सावरकर यांच्या जन्मभूमीत आंदोलनही करण्यात आले. (Rahul Gandhi Controversial Statement Savarkar Bhagur Bandh Nashik)

या बंदच्या पार्श्वभूमीवर भगूरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भगूरमधील नागरिकांनी बंदला दिलेला पाठिंबा पाहता राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या बंदपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन पुकारले होते. या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर सावरकर यांच्या पुतळ्यावर दुधाने अभिषेक करण्यात आला आणि आता थेट भगूर बंदची हाक देण्यात आली.

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची. ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – आफताबकडून 2020 मध्येही श्रद्धाच्या हत्येचा प्रयत्न; पाठ अन् मानेवर मारहाणीच्या खुणा; डॉक्टरांचा खुलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -