मुंबई : “राहुल गांधींच्या हातातील कागदपत्र पडली होती. यानंतर राहुल गांधींने बोटाने इशारा केला म्हणून कोणी त्याला फ्लाईंग कीस म्हणू नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी या भाषण करत असताना काँग्रेस नेता राहुल गांधींनी संसदेतून बाहेर जाताना महिला खासदारांना फ्लाईंग किस केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक भूमिक घेतली.
राहुल गांधींच्या फ्लाईंग मुद्यावर अमोल मिटकरी म्हणाले, “सभागृहात राहुल गांधी यांच्या हातातील कागदपत्रे पडली होती. तेव्हा राहुल गांधींनी बोटाने इशारा केला म्हणून कोणी प्लाईंगकीस म्हणू नये. देशासमोर महागाई आणि बेरोजगारीसारख्या मोठ्या समस्या आहेत. या समस्या फ्लाईंगकीस पेक्षाही मोठ्या आहेत. जर बोट दाखवण्याला कोणी फ्लाईंग कीस म्हणत असेल, तर हा नव्याने लागले शोध आहे”, असे म्हणाले.
हेही वाचा – PM Narendra Modi : शतकात अनेक संधी, या काळाचा प्रभाव हजारो वर्षांपर्यंत राहील – मोदी
मिटकरींची भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला
राहुल गांधी विरोधात राज्यात आंदोलन करणाऱ्यांना भाजप महिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “चित्रा ताईंनी कशासाठी आंदोलन केले पाहिजे, याचा विचार केला पाहिजे.” यावेळी आमदार किशोर पाटलांवर बोलताना मिटकरी म्हणाले, “कोणत्याही आमदारांनी अशा प्रकारची शिविगाळ करू नये आणि पत्रकारांनी देखील गरीमा राखली पाहिजे.”