घरताज्या घडामोडीराहुल गांधींच्या अडचणी वाढणार? सावरकरांच्या नातूंकडून बदनामीची तक्रार

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? सावरकरांच्या नातूंकडून बदनामीची तक्रार

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी बदनामीचा फौजदारी तक्रार दाखल केला आहे. इंग्लंडमध्ये केलेल्या विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी बदनामीचा फौजदारी तक्रार दाखल केला आहे. इंग्लंडमध्ये केलेल्या विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Rahul Gandhi In Trouble On Savarkar Issue File A Criminal Complaint By Satyaki Savarkar vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, सावरकरांच्या एका भावाचा नातू असलेल्या सत्यकी सावरकर यांनी याबाबत दिली. त्यावेळी सांगितले की, “राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एका भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे. सावरकरांनी आपल्या ५ ते ६ मित्रांच्यामदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटला होता”, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

- Advertisement -

परंतु, राहुल गांधी यांनी सांगितलेला हा संदर्भ खोटा असून काल्पनिक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून आम्ही अनेकदा सावरकर यांच्याविरोधातील तथाकथीत माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकले आहे. पण प्रत्यक्षात त्या क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सावरकरांविरोधातील या विधानांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती सत्यकी सावरकर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून पेटलेला मुद्दा शांत होतोच न होतो, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर यांच्यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस असून आता हा दिवस “स्वातंत्र्यवीर गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – येत्या शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मुंबईत बैठक; मनपा निवडणुकीचा घेणार आढावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -