Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राहुल गांधी भारतविरोधी एजंटचं काम करतायत, निलेश राणेंचा हल्लाबोल

राहुल गांधी भारतविरोधी एजंटचं काम करतायत, निलेश राणेंचा हल्लाबोल

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा खटला, त्यानंतर न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस या कारवाईला विरोध करत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि एनडीएतील पक्ष या कारवाईचं समर्थन करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी अमेरिकेने नाराजी व्यक्त केल्यानंतर जर्मनीनेही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. दरम्यान, जर्मनीने भाष्य केल्यानंतर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की, आपल्या देशाची बदनामी वेगवेगळ्या देशात करू लागले आहेत. राहुल गांधींना एक टक्काही लाज वाटत नाही की, आपण आपल्या देशाची अब्रू दुसऱ्या देशात का काढतोय. राहुल गांधी भारतीय होऊ शकत नाहीत, ते भारतविरोधी एजंटचं काम करतायत, असं ट्विट करत निलेश राणेंनी राहुल गांधींवर टीका केली.

- Advertisement -

राहुल गांधी याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर ही कारवाई योग्य की अयोग्य हे स्पष्ट होईल. आम्ही या प्रकरणाकडे लक्ष ठेऊन आहोत. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करताना लोकशाहीची मूलभूत तत्त्वं पाळली जावी, अशी प्रतिक्रिया जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींवरील कारवाईप्रकरणी प्रतिक्रिया देणारा जर्मनी हा पहिला युरोपीय देश आहे. तसेच अमेरिकेनेही याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिल्यानंतर निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 2009 ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. AICC व IYC ऑफिस शासकीय बंगल्यात आहेत. सोनिया गांधी ज्या घरात राहतात ते घर भारताच्या पंतप्रधानांकडे असलं पाहिजे पण त्या आजही तिथे राहतात”, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच, देश तुमच्या बा** माल आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.


हेही वाचा : राम नवमी साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना


 

- Advertisment -