मुंबई : आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईत सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक हैं तो सेफ या नाऱ्यावरून चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेत एक तिजोरी दाखवली त्यामध्ये मोदी आणि अदानींचा फोटो होता. तो दाखवत ते म्हणाले, हा नारा फक्त अदानींसाठी आहे. एक हैं तो सेफ यामध्ये फक्त अदानी सेफ असल्याचे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi On PM Narendra Modi.)
हेही वाचा : Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी यांची पोस्ट…म्हणाले…
पत्रकार परिषद सुरू असताना राहुल गांधींनी एका तिजोरीतून दोन पोस्टर काढले. त्याच्यामध्ये एका पोस्टरवर उद्योगपती अदानी आणि मोदींचा फोटो होता, तर दुसऱ्या पोस्टरवर धारावीच्या पुनर्विकासाचा आराखडा आखण्यात आला होता. एका पोस्टवरून त्यांनी मोदी आणि अदानींचा प्रश्न उपस्थित केला आहे. तर दुसऱ्यावर त्यांनी धारावीचा मुद्दा उपस्थित केल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मी…, निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे काय म्हणाले
तसेच आगामी विधानसभा ही महाराष्ट्रातील विचारधारेवर अवलंबून आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर महिलांना 3000 रुपये देणार आहोत. तसेच सत्तेत आल्यावर जातीय जणगणना देखील केली जाणार असे त्यांनी सांगितले आहे. युवकांना बेरोजगारी भत्ता 4000 रुपये देण्यात येणार आहे.
याचवेळी त्यांनी एक है तो सेफ हे म्हणत तिजोरी दाखवत पंतप्रधानाना टोला लगावला आहे. ते म्हणाले, धारावी आणि विमानतळ ही अदानींना दिली जात आहेत. तसेच मोदींनी दिलेल्या नाऱ्यामध्ये फक्त अदानी सेफ आहेत, असेही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी धारावीचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. पंतप्रधानाच्या आधाराशिवाय धारावीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे मोदी हे अदानींना मदत करत असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. तसेच मोदींनी फक्त हा नारा दिला आहे, आम्ही तो जनतेला समजावल्याचे ते म्हणाले आहेत.
Edited By Komal Pawar Govalkar