घरमहाराष्ट्रराहुल गांधींनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये; फडणवीसांचा थेट इशारा

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये; फडणवीसांचा थेट इशारा

Subscribe

सुरुवातीच्या काळात भारत जोडो यात्रेकडे माध्यमांचे लक्ष नव्हते, त्यामुळेच माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी अशी वादग्रस्त विधानं करत आहेत. असंही फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरुद्ध जे वक्तव्य केले त्यावरून राजकीय वर्तुळातुनही टीका केली जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा दिली आहे. त्यांची यात्रा राज्याबाहेर सुरक्षितपणे पाठवू. पण त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. गुजरातमधील भावनगर येथे देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असताना फडणवीसांनी राहुल गांधींना सूचक इशारा दिला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण काँग्रेसला आता लक्षात आले की भारताची जनता नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचे असेल देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवे, तसे केले नाही तर देशात काँग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत असे म्हणत फणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली.

- Advertisement -

याच संदर्भात फडणवीस पुढे म्हणाले, भाजपाबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक भावना आहे. राहुल गांधींसारख्या लोकांवर कारवाई करण्याचा फायदा नसतो. अनेक केसेस त्यांच्यावर याआधीही झाल्या आहेत. ते जामीनावरच बाहेर आहेत. अनेकदा कोर्टात हजर राहत नाही म्हणून वॉरंटही निघतात. ते जे खोटं बोलतात त्यावर आम्ही उत्तर देऊ. तसेच सुरुवातीच्या काळात भारत जोडो यात्रेकडे माध्यमांचे लक्ष नव्हते, त्यामुळेच माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी अशी वादग्रस्त विधानं करत आहेत. असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेमध्ये नाराजी आहे. 12 वर्ष ज्यांनी काळ्या पाण्याहची, तुरुंगाची शिक्षा भोगली. त्यांच्याबद्दल ज्यांनी कधी जेल पाहिली नाही अशांनी बोलावे. त्यामुळे निश्चित लोकांमध्ये राहुल गांधींनी जे विधान केले त्याबाबत संताप आहे. प्रत्येकवेळी राहुल गांधी सावरकरांबाबत वाटेल ते बोलतात. त्यानंतर त्यावर शिवसेनेचे नेते बोलतात. सावरकरांसाठी ते सत्ता कधीच सोडू शकत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनाही खोचक टोला लगावला.

- Advertisement -

हे ही वाचा – मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू; आदित्य ठाकरेंचा खोके सरकारवर निशाणा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -