Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सावरकरांनी ज्या तुरुंगात यातना भोगल्या त्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस जावे...

सावरकरांनी ज्या तुरुंगात यातना भोगल्या त्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस जावे – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

हे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय आणि राहुल गांधीही उपभोगताहेत त्यांनी एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर जे अंदमानमधील तुरुंगात होते. त्यांनी ज्या यातना भोगल्या त्या तुरुंगात त्यांनी एक दिवस राहुल आले तर त्यांनी त्याची जाणीव होईल.

‘ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि देशभक्तांनी बलिदान देत स्वातंत्र्य मिळवले. त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अपमान करण्याचे निंदनिय प्रकार केला जातो. त्यांचा निषेध संपूर्ण देशभरात केला जातोय. हे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय आणि राहुल गांधीही उपभोगताहेत त्यांनी एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर जे अंदमानमधील तुरुंगात होते. त्यांनी ज्या यातना भोगल्या त्या तुरुंगात त्यांनी एक दिवस राहुल आले तर त्यांनी त्याची जाणीव होईल’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. (Rahul Gandhi should visit jail in andaman for a day where Savarkar was tortured says CM Eknath Shinde)

दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार राहुल गांधी यांच्याकडून अपमान होत आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. ज्या स्वातंत्र्यावीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हे आंदोलन करत असताना काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे या देशभक्तांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. या लोकशाहीत प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वावरण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. परंतु, ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि देशभक्तांनी बलिदान देत स्वातंत्र्य मिळवले. त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अपमान करण्याचे निंदनिय प्रकार केला जातो. त्यांचा निषेध संपूर्ण देशभरात केला जातोय. हे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय आणि राहुल गांधीही उपभोगताहेत त्यांनी एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर जे अंदमानमधील तरुंगात होते. त्यांनी ज्या यातना भोगल्या त्या तुरुंगात त्यांनी एक दिवस राहुल आले तर त्यांनी त्याची जाणीव होईल. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या”, असेही शिंदे म्हणाले.

“परंतु, राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर ज्यांनी त्याचा निषेध केला. ते वारंवार सांगताहेत की, आम्ही सावरकर नाही तर, गांधी आहोत. सावरकर व्हायची तुमची लायकी ही नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही. तुम्ही काय सावरकर होऊ शकतात? सावरकर व्हायला त्याग आणि देशाबद्दलचे प्रेम तुमच्यात असायला पाहिजे. तुम्ही या देशाची निंदा परदेशात जाऊन करताहेत. याच्यापेक्षा या देशाचे काय दुर्देव असू शकतं. तुम्ही देशाच्या लोकशाहीबद्द्ल बोलताहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप समजू शकतो. पण आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणे याचा निषेध करतो”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – 

- Advertisment -