नाना पटोलेंपेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात; राऊतांचं मोठं विधान

संजय राऊत यांना नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, नाना पटोलेंच काय सांगता त्यांना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही. याबाबत मी राहुल गांधींशी बोलेन ते पटोलेंपेक्षा माझ्याशी जास्त बोलतात, असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा पटोलेंवर हल्ला चढवला आहे.

Sanjay Raut confirmed the 'that' news about Anil Deshmukh

मागच्या काही दिवसांपासून मविआमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि संजय राऊत असा सामना रंगला होता. आता संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये शाब्दिक सामना रंगला आहे. त्यातच आता राऊत यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. ( Rahul Gandhi talks to me more than Nana Patole Sanjay Raut big statement )

संजय राऊत यांना नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, नाना पटोलेंच काय सांगता त्यांना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही. याबाबत मी राहुल गांधींशी बोलेन ते पटोलेंपेक्षा माझ्याशी जास्त बोलतात, असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा पटोलेंवर हल्ला चढवला आहे.

राऊत यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आहेत, मात्र निर्णय राहुल गांधीच घेत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना, राऊतांनी आमच्या पक्षात चोमडेपणा करु नये, असं म्हटलं. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पलटवार करताना पटोलेवर हल्लाबोल केला आहे.

एकीकरण समितीचे उमेदवार पाडण्यासाठी षड्यंत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावात आम्ही तुरुंगात गेल्याचं म्हटलं होतं. तर आता एकीकरण समितीच्या प्रचाराला या. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असं राऊत म्हणाले. पण त्याउलट एकीकरण समितीचे उमेदवार पाडण्यासाठी काही खोके पाठवले आहेत, ही तुमची महाराष्ट्रावरची निष्ठा आहे का? असं म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे.

वज्रमूठ सभा होणारच

वज्रमूठ सभा रद्द झाल्याबाबत राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, सभा होणारच. वज्रमूठ सभेबाबत चर्चा होत आहेत. पुणे आणि कोल्हापूरच्या सभांबाबत चर्चा होत आहे. 28 तारखेला होणारी वज्रमूठ सभा ही होणारच आहे, अशी मला पक्की माहिती असल्याचं राऊत म्हणाले.

( हेही वाचा: राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरूच; अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा )