हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. तेलंगणातून महाराष्ट्रात पदयात्रा येताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी तिरंगा झेंडा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती सोपवला.दरम्यान, नांदेडमध्ये गुरू नानक जयंतीनिमित्त रात्रभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. तिथे त्यांनी गुरू नानक देव यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात पोहोचली.
तेलंगणातून महाराष्ट्रात पदयात्रा येताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी तिरंगा झेंडा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती सोपवला.
कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे.
ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील १४ दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे मा. खा. राहुलजी गांधी यांनी म्हटले.
दरम्यान, नांदेडमध्ये गुरू नानक जयंतीनिमित्त रात्रभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते.
यावेळी राहुल गांधी शिखांच्या पारंपरिक वेषात दिसले.
तिथे त्यांनी गुरू नानक देव यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली.