सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचे तुषार गांधींकडून समर्थन, म्हणाले…

राहुल गांधींनी जे सत्य आहे तेच सांगितले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत (bharat jodo yatra)आहेत. याच भारत जोडो यात्रेत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधीसुद्धा सहभागी झाले होते. राहुल गांधी (rahul gandhi) यांनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केले त्याचे तुषार गांधी यांनी समर्थन केले आहे.

राहुल गांधी यांनी सावरांबद्दल जे वक्तव्य केले होते त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . भाजप, मनसे आणि शिंदे गट यांच्याकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी सावरकरांच्या नातेवाईकांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मात्र राहुल गांधींना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल समर्थन दर्शविले आहे.

याच संदर्भात तुषार गांधी (tushar gandhi) म्हणाले, “राहुल गांधींनी जे सत्य आहे तेच सांगितले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेन्शन घेतली होती. याशिवाय पुढील काळात इंग्रजांसाठी त्यांनी कामही केले होते. आपण जर सत्य सांगायला घाबरलो तर आपण सत्याशी दगाबाजी करतोय.”

मी अनेक दिवसांपासून बारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचा विचार करत होतो. पुरोगामी विचाराच्या लोकांनी या यात्रेत सहभागी होण्याची गरज आहे. यात्रा शेगावमध्ये येत आहे हे समजताच मी यात्रेत सहभागी होणयाचा निर्णय घेतला. हे माझे जन्मस्थळ आहे असंही तुषार गांधी म्हणाले.

सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावरकरांचे नातू रणजित सावरकर (ranjit savarkar) यांनी केली.


हे ही वाचा – सौदी अरेबिया सरकारचा भारतीयांसाठी मोठा निर्णय; व्हिसासाठी आता ‘या’ गोष्टीची गरज नाही