आता आदित्य ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी तुलना, राहुल कनालच्या ट्विटमुळे संताप

मुंबईः महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांसंदर्भातील वक्तव्याचा वाद सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारे छायाचित्र समोर आल्याने नवा वाद उफाळून आला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी हे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे.

‘रयतेचा राजा, शिवबा माझा’, असे सांगत छत्रपतींच्या बरोबरीने त्याच मुद्रेतील आदित्य ठाकरे यांचे हे छायाचित्र आहे. छत्रपती शिवरायांशी आदित्य ठाकरे यांची तुलना करणाऱ्या या छायाचित्राला बाळासाहेबांच्या शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान करणाऱ्या राहुल कनाल यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, तसेच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिला आहे.

छत्रपती शिवरायांच्या सोडाच, पण त्यांच्या मावळ्यांच्या पायाशी बसण्याची आपली पात्रता नाही. छत्रपतींशी स्वतःशी तुलना करून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांनी तात्काळ माफी मागितली नाही, तर उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


हेही वाचा : ‘तारीख पे तारीख’ला चाप बसण्यासाठी उपाययोजनांची गरज