घरमहाराष्ट्रआमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा विधानसभा अध्यक्षांना अधिकार, राहुल नार्वेकरांचा निर्वाळा

आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा विधानसभा अध्यक्षांना अधिकार, राहुल नार्वेकरांचा निर्वाळा

Subscribe

मुंबई : विधानसभेतील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनाच आहे, असा निर्वाळा देत विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून कायद्यानुसार या प्रक्रियेला जितका वेळ लागेल, त्यानुसार कायद्यातील तसेच संविधानातील सर्व तरतुदींचे पालन करूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या उपाध्यक्षांना आपण कामाची योग्य ती संधी देत नाही, विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या सदस्यांशी पक्षपात करतात, हा विरोधी पक्षाचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत येत्या 23 जानेवारी रोजी विधिमंडळातील मध्यवर्ती सभाग़हात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. या निर्णयाचाही माहिती देताना नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या विषयावर भाष्य केले.

- Advertisement -

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधिमंडळाचे नियम आहेत. घटनेच्या दहाव्या अनुच्छेदातही या संदर्भात मार्गदर्शक सूचना आहेत. तसेच दोन दिवसांची नोटीस दिली आणि आमदारांना लगेच अपात्र ठरवले, असा निर्णय होऊ शकत नाही. कायदा, संविधान, नियम, तरतुदी या सर्वांचा परिपूर्ण विचार करूनच मी निर्णय देणार आहे. या कायदेशीर प्रक्रियेला जो वेळ लागेल, त्यानंतरच निर्णय येईल, असेही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

मी विधानसभा उपाध्यक्षांना काम करायला देत नाही किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांशी पक्षपात करतो, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. विधानसभेत 288 सदस्य असतात. मी प्रत्येकाचे समाधान करू शकत नाही. त्यामुळे काही जणांची नाराजी असू शकते. पण विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान सर्वच सदस्य राखतात, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

ठाकरे कुटुंबातील प्रत्येकाला आमंत्रण
बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी या जयंतीदिनी त्यांचे तैलचित्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभाग़हात लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होईल. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशात ख्यातकीर्त असे मोठे नेते होते. त्यांचे तैलचित्र विधिमंडळासारख्या घटनात्मक संस्थेच्या मुख्यालयात लागणे, हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. एव्हढ्या मोठ्या कलावंत नेत्याचे तैलचित्र तयार करताना पूर्ण काळजी घेऊन, गांभीर्यानेच काम झाले आहे, असे सांगत नार्वेकर यांनी बाळासाहेबांच्या चित्रावरून कोणीही वाद करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -