घरमहाराष्ट्रराहुल नार्वेकर पहिले नव्हे, तर दुसरे तरुण विधानसभा अध्यक्ष

राहुल नार्वेकर पहिले नव्हे, तर दुसरे तरुण विधानसभा अध्यक्ष

Subscribe

ॲड. नार्वेकर हे आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष आहेत. नार्वेकर यांचे वय ४५ वर्ष पाच महिने इतके आहे.

शिंदे सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी ३ जुलैला मतदान झाले. या निवडणुकीत भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवींचा अर्ज भरण्यात आला होता. या निवडणुकीत भाजप-शिंदे युतीचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. आमदार राहुल नार्वेकर यांना १६४ तर साळवी यांना १०७ मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींचा ५७ मतांनी पराभव झाला. विधानसभा अध्यक्षपदासाठी २८८ सदस्यांच्या सभागृहात एका सदस्याचे निधन झाले असल्याने संख्याबळ २८७ आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी रविवारी समाजवादी पार्टीचे १ तर एमआयएमचे २ सदस्य तटस्थ राहिले. १२ आमदार अनुपस्थित होते.

ॲड. नार्वेकर हे आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष आहेत. तर शिवराज पाटील चाकूरकर हे विधानसभेचे पहिले तरुण अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांचे वय ४२ वर्ष ७ महिन्याचे होते. तर नार्वेकर यांचे वय ४५ वर्ष पाच महिने इतके आहे. नार्वेकरांच्या निवडीसाठीचा प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आवाजी मतदानाला टाकला. पण विरोधकांनी आक्षेप घेताच उपाध्यक्ष झिरवाळ यांनी प्रस्तावाच्या बाजूला कोण, विरोधात कोण आणि तटस्थ कोण अशा शिरगणतीचे आदेश दिले.

- Advertisement -

नार्वेकर निवडून आल्याचे त्यांनी जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अजय चौधरी नार्वेकर यांना सन्मानाने आसनापर्यंत घेऊन गेले. राहुल नार्वेकर हे सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजपा नेते म्हणाले. मात्र, राहुल नार्वेकर हे दुसरे तरुण अध्यक्ष आहेत. दरम्यान देशात तरुण अध्यक्ष म्हणून काँग्रेस नेते अजय माकन यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. ते अध्यक्ष झाले तेव्हा ३९ वर्षांचे होते.

आजपर्यंतचे अध्यक्ष                 वय

- Advertisement -

सयाजी सिलम                       ६४

बाळासाहेब भारदे १                 ४७

बाळासाहेब भारदे २                 ५२

शेषराव वानखेडे                    ५७

बाळासाहेब देसाई                   ६७

शिवराज पाटील                      ४२

प्राणलाल व्होरा                       ५२

शरद दिघे                            ५५

शंकरराव जगताप                    ६०

मधुकरराव चौधरी                    ७०

दत्ताजी नलावडे                     ५९

अरुणलाल गुजराथी                 ५७

बाबासाहेब कुपेकर                ६२

दिलीप वळसे                      ५३

हरिभाऊ बागडे                    ७०

नाना पटोले                        ५६

राहुल नार्वेकर                     ४५

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -