घरताज्या घडामोडीहा अराजकीय कार्यक्रम.., बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याबाबत राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

हा अराजकीय कार्यक्रम.., बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याबाबत राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

Subscribe

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राज्यातलेच नव्हे तर देशात अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. जनसामान्यांमध्येही सातत्याने इच्छा होती की, त्यांच्या केलेल्या कार्याचा आणि त्यांनी राज्याला, देशाला दिलेल्या योगदानाची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं तैलचित्र लागणं ही सर्वांच्या मनातली इच्छा होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात निवदेन दिलं होतं. त्या निवेदनाच्या आधारावर मी गेल्या अधिवेशनात घोषणा केली होती. हा अराजकीय कार्यक्रम असल्याचं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा 23 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात अत्यंत भव्यदिव्य असा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आमदार, खासदारांसह राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. त्याचबरोबर क्रीडा, कला, सिनेमासृष्टी आणि ज्या मंडळींचं बाळासाहेबांबरोबर स्नेह होतं, अशा सर्व मंडळींना आम्ही आमंत्रण दिलं आहे. तसेच ठाकरे कुटुंबियांतील सर्वच सदस्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक श्रद्धांजली आपण बाळासाहेबांना देणार आहोत.

- Advertisement -

तीन ते चार कलाकारांकडून आम्ही तैलचित्र बनवून घेतलं आहे. चार फोटो आहेत त्यापैकी जो चांगला वाटेल आणि प्रोटोकॉलचं भान ठेवून लावण्यात येणार आहे. कुठल्याही व्यक्तीचं तैलचित्र आपण सेंट्रल हॉलमध्ये लावतो. त्यावेळी आपण गांभीर्यपूर्वक आणि काळजी घेऊन लावतो. बाळासाहेबांचा आदर संपर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक हा निर्णय घेतला जाईल. बाळासाहेबांची प्रतिमा अत्यंत मोठी आहे. त्या प्रतिमेला गौरांकित करण्याचं काम तैलचित्र लावून आपण करत आहोत. त्यामुळे अशा प्रसंगाचं महत्त्व कमी करण्याचं कार्य कुणीही करू नये. हा अराजकीय कार्यक्रम असून विधिमंडळाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सेंट्रल हॉलमध्ये आपण तैलचित्र लावतो. पण नाव किंवा पदवी आपण लावत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

- Advertisement -

या कार्यक्रमाला संध्याकाळी ६ वाजता सुरूवात होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक चित्रफितही दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील आणि तैलचित्राचं अनावरण केलं जाईल. या कार्यक्रमाला केंद्रातून महाराष्ट्रातले मंत्री येणार आहेत, असं नार्वेकर म्हणाले.

अविश्वास ठराव आणणे हा त्यांचा अधिकार

आश्वासन समिती फार महत्त्वाची समिती आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देऊन सगळी आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. विधानसभेत २८८ आमदार आणि ६ ते ७ प्रमुख पक्ष आहेत. प्रत्येक आमदार आणि पक्षाला आपल्या मनासारखे झाल्याचे वाटत असते. पण अध्यक्ष हा विधानसभेचा असतो. त्यामुळे अध्यक्षांची गरिमा ठेवणे हे २८८ आमदारांचे काम आहे. अविश्वास ठराव आणणे हा त्यांचा अधिकार आहे, असंही नार्वेकर म्हणाले.


हेही वाचा : 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण, निमंत्रण पत्रिकेतून ठाकरेंचं नाव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -