Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रRahul Shewale : लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार; राहुल शेवाळेंना विश्वास

Rahul Shewale : लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार; राहुल शेवाळेंना विश्वास

Subscribe

अणुशक्तीनगर येथील मतदान केंद्रावर जाऊन राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन राज्यातील मतदारांना केले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील बहिणींसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना तसेच लेक लाडकी योजना यांच्यासह अनेक योजना या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे यंदा राज्यातील लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहतील, असे मत माजी खासदार शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यात महायुती सरकारचा विजय होईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. अणुशक्तीनगर येथील मतदान केंद्रावर जाऊन राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन राज्यातील मतदारांना केले आहे. (Rahul Shewale on Mahayuti Sarkar.)

हेही वाचा : Vinod Tawde : …तर सुप्रिया सुळेंनी मला पाच कोटी द्यावे, विनोद तावडे असे का म्हणाले? 

- Advertisement -

धारावी आणि अणुशक्तीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांतील मुस्लीम समाजाची तसेच इतर कष्टकरी वर्गाची मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या पारड्यात पडल्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात सलग दोनदा खासदार राहिलेल्या राहुल शेवाळेंचा पराभव झाल्याचे दिसून आले आहे. जनतेचा नेता किंवा मतदारसंघातील नागरिकांसाठी कायम उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी अशी राहुल शेवाळेंची मतदारसंघातील ओळख असल्याचे बोलले जाते. मात्र मतांचे विभाजन आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का कमी झालेले मतदान हे देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : Thackeray Vs Shinde : प्रणिती शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, सुशीलकुमार शिंदे यांनीही सुनावलं

- Advertisement -

राज्यातील काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती ही राहुल शेवाळेंच्या पराभवाचे कारण असल्याचे देखील बोलले जात आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात धारावी, वडाळा, शीव-कोळीवाडा, माहिम, चेंबूर, अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये धारावी आणि अणुशक्तीनगरमधून इतर भाषिक कष्टकरी वर्गाने राहुल शेवाळेंच्या पारड्यात मते टाकली होती. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पदरात अपयश पडल्याचे दिसून आले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -