घरमहाराष्ट्र'आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या वाहनांची टोलमाफी व्हावी'

‘आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या वाहनांची टोलमाफी व्हावी’

Subscribe

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी लेखी मागणीखासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी लेखी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठु माऊलीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

राहुल शेवाळेंनी ‘या’ मंत्र्यांना पाठवले पत्र

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्याची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचे अविभाज्य अंग आहे. यंदाही १२ जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातुन वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी देण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री, रस्ते व विकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -