घरमहाराष्ट्ररायगडमध्ये भीषण अपघात; मालाड येथील नऊ जणांचा जागीच मृत्यू

रायगडमध्ये भीषण अपघात; मालाड येथील नऊ जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

माणगाव येथील रेपोली गावाजवळ ही घटना घडली. ट्रक व कारची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की गऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षांच्या मुलगा जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.

रायगडः महाड येथील रेपोली गावाजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघतात मालाड येथील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचे शव माणगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

मुंबई- गोवा महामार्गाजवळ माणगाव येथील रेपोली गावाजवळ ही घटना घडली. ट्रक व ईको कारची धडक झाली. खेड येथील लोटे एमआयडीसीमधून निघलेला ट्र्क (एम एच ४३ यु ७११९) व मालाड येथून निघालेल्या ईको कारची (एम एच ४८बी टी८६७३) रेपोली गावाजवळ धडक झाली. ईको कारमधील प्रवासी गुहागर येथील हेदवी गावाकडे जात होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक व कारची धडक इतकी भीषण होती की पहाटेच्या अंधारात झालेल्या या अपघतात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच पुरुष, तीन महिला व एका लहान मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकला जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतांचे शव माणगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मदतकार्य सुरु झाले. अपघात इतका विचित्र होता की सर्वांनाच धक्का बसला. मृतांचे शव रुग्णवाहिकेतून माणगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. त्यावेळी चार वर्षांचा चिमुकला जीवंत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

गोरेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकृष्ण नावले व त्यांच्या पथकाने तातडीने कार्यवाही करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीत ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिल्याची माहिती आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाल्याने तूर्त तरी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी समोर आलेला नाही. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तपासाअंती अपघाताचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

अपघातामध्ये ५ पुरुष ३ महिला आणि एका लहान मुलगी, अशा नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. मृत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्व गुहागर येथील हेदवी येथे जात होते. अपघातानंतर तत्काळ मदतकार्य करून महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे, अशी माहिती रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -