घरताज्या घडामोडीरायगड : 'पुढील ३८ तासांत परिस्थिती पूर्ववत करु'

रायगड : ‘पुढील ३८ तासांत परिस्थिती पूर्ववत करु’

Subscribe

पुढील ३८ तासांत परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर नुकसानग्रस्त भागाचा त्वरित पंचनामा करुन अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.

पश्चिम किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर मुंबईसह इतर जिल्ह्यात देखील याचा मोठा फटका बसला आहे. तर या चक्रीवादळाने ठिकठिकाणी लोकांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. तर काही ठिकाणी झाडं गाड्यांवर पडून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार उडाला आहे. तर पुढील ३८ तासांत परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर नुकसानग्रस्त भागाचा त्वरित पंचनामा करुन अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.

६ ते १२ तासांत रस्ता करणार पूर्ववत

रायगड जिल्ह्यात अनेक भागांत रस्त्यांवर झाडे पडली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर ये- जा करण्याचा अडथळा निर्माण झाला आहे. परंतु, हा अडथळा दूर करणे आणि वीज पुरवठा पूर्ववत करुन रस्ता ६ ते १२ तासांत पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार; योग्य वेळी नागरिकांचे स्थलांतर केल्याने जीवितहानी टळली आहे. त्यामुळे पुढील काही तासं असंच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

एकाचा मृत्यू

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे वित्तहानी झाली असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डिपीचा खांब पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफ, तटरक्षक दल तैनात केले होते. त्यमुळे आपत्ती रोखण्यासाठी मदत झाली आहे, असेही चौधरी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वादळानंतर राज्यात पावसाची दमदार हजेरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -