घरताज्या घडामोडीरायगडावरील हत्ती तलाव तब्बल १५० वर्षांनंतर तुडुंब भरला

रायगडावरील हत्ती तलाव तब्बल १५० वर्षांनंतर तुडुंब भरला

Subscribe

रायगडावर असलेला हत्ती तलाव तब्बल दीडशे वर्षांनंतर प्रथमच तुडुंब भरल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

रायगडावर असलेला हत्ती तलाव तब्बल दीडशे वर्षांनंतर प्रथमच तुडुंब भरल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे त्यांच्या हस्ते अलिकडेच या तलावाचे जलपूजनही करण्यात आले होते.

दरम्यान, रायगडावर असलेल्या या हत्ती तलावाचे विशेष महत्व असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पाणी नियोजनामध्ये या तलावाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, काळाच्या ओघात तलावाला गळती लागली होती. ४० वर्षांपूर्वी या तलावाची दुरुस्ती झाली होती. परंतु, गळती जैसे थे होती. सिमेंट आणि दगड एकजीव न झाल्याने ही गळती कायम राहिली. यामुळे या तलावात गेली कित्येक वर्षे पाणी साठत नव्हते. येणार्‍या पर्यटकांना केवळ गंगासागर तलावच पहायला मिळत होता. दरम्यान, किल्ल्यावर खासदार संभाजीराजे अध्यक्ष असलेल्या रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून दुरुस्तीची कामे सुरू करत तलावाच्या दुरुस्तीचेही काम करण्यात आले होते.

- Advertisement -

गेले काही महिने स्थानिक कामगारांच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्यात आला. गाळ काढताना तलावाच्या भिंतीशेजारी एक खोल खड्डा आढळला. यातून १२ फूट गाळ काढला आहे. खड्ड्याच्या दोन्ही बाजूला अंदाजे ५ ते ६ फुटाच्या घळी दिसून आल्या होत्या. यातून ही गळती होत असल्याचे निष्पन्न झाले. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे ही गळती दिसून आली. चुन्याची स्लरी वापरून टप्प्याटप्प्याने तलावाची गळती काढली गेली. हत्ती तलाव हा बांधीव तलाव प्रकारातील आहे. या तलावामध्ये १५ एम.एल.डी. म्हणजे जवळपास दीड कोटी लीटर पाणी साठा होत असण्याची शक्यता आहे. या तलावाचा वापर शिवकाळात हत्तींसाठी होत असावा म्हणून याचे नाव हत्ती तलाव पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तलावाची उंची पाहता यात हत्ती जाणे शक्य नाही.

अलिकडच्या मुसळधार पावसामुळे हा तलाव पूर्णपणे भरला असून, गेल्या काही दिवसांपासून त्यातील पाणी ओसंडून वाहत आहे. या ऐतिहासिक क्षणाची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी गडाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी गडावरील रानफुलांनी तलावाचे जलपूजन केले. सुमारे दीडशे वर्षांनंतर हत्ती तलाव पाण्याने भरला असून, वाहत असल्याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या बरोबर सा.बां. विभागाचे शाखा अभियंता बुरळे, प्रधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने उभे केले ३३ पुल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -