Homeमहाराष्ट्रनाशिकRaigad Matheran Tourist : पर्यटकांमुळे माथेरान हाऊसफुल्ल!

Raigad Matheran Tourist : पर्यटकांमुळे माथेरान हाऊसफुल्ल!

Subscribe

दिनेश सुतार : आपलं महानगर

माथेरान : हिल स्टेशन माथेरानला अवघ्या दीड महिन्यात तब्बल १ लाख ६० हजार ३८७ पर्यटकांनी भेट दिली आहे. म्हणजे १ मे ते १७ जून या कालावधीत रोज सरासरी ३ हजार ३४१ पर्यटक माथेरानमध्ये आले आणि येथील थंड हवेचा आनंद घेतला. या रेकॉर्डब्रेक गर्दीमुळे थंडा थंडा कूल असलेले माथेरान पर्यटकांचे सर्वात हॉट फेव्हरेट हिल स्टेशन असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

या दीड महिन्यात मुंबई पुण्यासह गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतून आलेल्या पर्यटकांनी माथेरानच्या ऊर्जायुक्त थंड हवेची अनुभूती घेतली. वीकेण्डला होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे यंदा माथेरानच्या पर्यटनाला जबरदस्त चालना मिळाली आहे. त्याचवेळी आता पावसाळी पर्यटन हंगामासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

हेही वाचा… Raigad Police Bharati : रायगड पोलीस भरतीतील मैदानी चाचणी या दिवशी

समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर वसलेल्या माथेरानमध्ये वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. स्वच्छंदी निसर्ग, झाडांची जाळी, कानाला सुखावणारे पक्षांचे आवाज, प्रदूषणमुक्त वातावरण, लाल मातीतून रपेट आणि घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत माथेरानमधील पॉईंटची भ्रमंती म्हणजे पर्यटकांसाठी एक सुखावह अनुभव असतो. शिवाय माथेरान हिल स्टेशन मुंबई – पुणे या दोन्ही मेट्रो सिटीच्या मध्यावर आहे. त्यामुळे माथेरानला पर्यटकांची पसंती मिळत असते.

हेही वाचा… Raigad Tax Outstanding : रायगडवासीयांकडून कोट्यवधींची थकबाकी कशी वसूल करणार?

माथेरानची लोकसंख्या तशी जास्त नाही. मात्र येथील अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. माथेरानची चिक्की, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, चप्पल, पर्स, आदी वस्तू प्रसिद्ध आहेत. तर हॉटेल, घोडे, छोटेमोठे व्यवसाय आदी व्यवसायांवर माथेरानकरांचा उदरनिर्वाह चालतो. वर्षभरातून काही ठराविक हंगामात माथेरानचे पर्यटन फुलत असते. त्यामुळे पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी माथेरानकर कायम उत्सुक असतात.

हेही वाचा… Raigad Alibaug News : स्वच्छ अलिबाग बनले अस्वच्छ

यंदा एप्रिल-मे महिन्यांत सर्वत्र प्रचंड उकाडा होता. तेव्हा पर्यटकांनी मुंबईजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरानला मोठी पसंती दिल्याचे चित्र आहे. 1 मे ते 17 जून या कालावधीत तब्बल १ लाख ६० हजार ३८७ पर्यटकांनी माथेरानला भेट दिली आहे. तर १५ जून ते १७ जून या तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक पर्यटक आले होते. यामुळे माथेरानच्या पर्यटनासोबत आर्थिक गणितदेखील द्विगुणित झाले आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रशासनकडूनदेखील चोख व्यवस्था ठेवण्यात येत आहे. आता मान्सून असल्यामुळे पावसाळी पर्यटकांचे पाय माथेरानकडे वळणार आहेत. तेव्हा पर्यटकांच्या दिमतीला माथेरानकरांसह प्रशासन सज्ज झाले आहे. – समीर भागवत, पर्यटक

(Edited by Avinash Chandane)