घरताज्या घडामोडीरायगडच्या तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात, मृत्यूचा आकडा ३६ वर पोहचला

रायगडच्या तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात, मृत्यूचा आकडा ३६ वर पोहचला

Subscribe

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे ३० ते ३५ घरे ढिगाऱ्याखाली आल्याची घटना गुरूवारी घडली होती. या घटनेमध्ये मृत्यूचा आकडा वाढतानाच ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या मदतीने मदतीची सुरूवात होतानाच याठिकाणी विविध यंत्रणांमार्फत रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. थोड्या वेळापूर्वीच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या रेस्क्यू ऑपरेशनबाबतची माहिती ट्विटरमार्फतच्या एका व्हिडिओतून दिली आहे. दरडीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, कोस्टगार्ड यासारख्या टीम कार्यरत झाल्या आहेत. तर स्थानिक पातळीवर १२ रेस्क्यू टीम रवाना झाल्या होत्या. बसच्या मदतीने याठिकाणी बचावसाहित्य पाठविण्यात आले आहे. महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत ३६ जणांना वाचवण्यात आले आहे. तर आणखी ३० जण अडकल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात दरड घरांवर कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी ३० जण अडकल्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. गुरूवारी सायंकाळीच ही घटना ४ वाजताच्या सुमारास घडलेली आहे. पण महाडला जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने कालपासून मदतकार्य पोहचवता आले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच बचावकार्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. पण सायंकाळी हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवण्यात अडथळे आल्याने गुरूवारी मदत पोहचवता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी एनडीआरएफची एक टीम पोहचली असून त्याठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारीही पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतून एनडीआरएफच्या एका टीमला एअरलिफ्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

गुरूवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाल्यावर दृश्यमानता अतिशय कमी झाली होती. त्यामुळे याठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत पोहचवणे कठीण झाले होते. पण आज सकाळीच एनडीआरफच्या टीमला याठिकाणी एअरलिफ्ट करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या टीमला लॅण्डिंगसाठीची जागा शोधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपुर्ण घटनेत मदतकार्य पोहचवण्यात प्रशासनाचे संपुर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुंबईकर येऊन ठाण्यातून येऊन लोक मदत करू शकतात, पण प्रशासन पोहचू शकत नाही असाही आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

तळीये गावामध्ये रात्री दरड कोसळल्याची घटना समोर आली होती. या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र सर्व पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने एनडीआरएफ आणि  बचावकार्य सुरु करण्यात आले. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण मातीच्या ढिगार्‍याखाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आहे.

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -