घरमहाराष्ट्रRaigad News: ह्रदयद्रावक घटना! आईने दोन मुलींसह कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेत केली...

Raigad News: ह्रदयद्रावक घटना! आईने दोन मुलींसह कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेत केली आत्महत्या, कारण…

Subscribe

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे.

गोरेगाव: रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. (Raigad News Heartbreaking incident A mother committed suicide by jumping under the Konkananya Express with her two daughters because)

कोकणकन्या एक्स्प्रेसखाली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला होता.

- Advertisement -

वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा मेसेज करून या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केली. मोहनला इकडे येऊन रुम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता, या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तत्काळ गोरेगाव पोलीस स्टेशन गाठले आणि रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला.

गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या चौदा आणि अकरा वर्षांच्या मुलींसह कोकणकन्या एक्स्प्रेसखाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

रीना यांते यापूर्वी एक लग्न झाले होते पहिल्या पतीपासून एक मुलगी होती तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली यांना होत्या मात्र रीना या आर्थिक संकटात त्या सापडल्या होत्या. मुलींच शिक्षण, खोलीचं भाडं या सगळ्यामुळे रीना हतबल झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

अशा परिस्थितीत रीना यांच्यावर कर्जही होती. पती कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रीना या मूळच्या गोरेगाव माणगाव परिसरातील आहेत. त्यांनी केरळ येथील जयमोहन नायर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. पण, पती दुसरीकडे राहात होता दोन्ही मुलींची शाळेची फी, क्लासची फी, खोलीचं भाडं, दैनंदिन व्यवहारातील खर्च भागवणं कठीण झालं होतं. इतकेच नव्हे तर यामुळे मोबाईलचे हफ्तेदेखील थकले होते. त्यामुळे त्यांनी अखेर मेसेज करून आपली जीवनयात्रा दोन मुलींसह संपवल्याने गोरेगाव परिसरत हादरला आहे.

(हेही वाचा: ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही…’; राऊत संतापले, म्हणाले, त्यात गुन्हा कसला? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -