घरमहाराष्ट्रपांढरा कांदयाने अलिबागच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा; मिळाले भौगोलिक मानांकन

पांढरा कांदयाने अलिबागच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा; मिळाले भौगोलिक मानांकन

Subscribe

भात उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. जिल्ह्यातील अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आता भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचा दर्जा, चव आणि उत्पादन क्षमतेवरून भौगोलिक मानांकन ( जीआय टॅग) मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मेहनतीला आता खऱ्या अर्थाने रंग आले आहेत. यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे महत्त्व वाढण्याबरोबरचं या कांद्याला हक्काची बाजारपेठ मिळणार आहे, शिवाय उत्पादनातही वाढ होईल. कृषी विद्यापीठ, भौगोलिक निर्देशांक आणि शेतकरी उत्पादन संघाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.

अलिबागच्या शेतकऱ्यांकडून येथील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मान्यता मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. इतकेच नाही येथील पांढऱ्या कांद्याचे गुणधर्म लोकांना पटवून दिले जात होते. अखेर औषधी गुणधर्म असलेल्या या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानांकन मिळाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या पेटंट विभागानेही या बाबत प्रस्तावाला मान्यता दिल्याने या कांद्याला स्वतंत्र्य ओळख मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासूनचा सुरु असलेला पाठपुरावा संपला आहे. 15 जानेवारी 2019 रोजी या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी नोंदणी करण्यात आली होती.

- Advertisement -

रुचकर आणि औषध गुणधर्म असलेल्या अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानंकन मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. अलिबागमधील नेहुली, खंडाळे, कार्ले, वडगावांसह परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यामुळे अलिबागच्या कांद्याची ओळख सातासमुद्रापार होणार आहे.

दरम्यान पांढऱ्या कांद्याला जीआय टॅग मिळाल्याने अलिबागला आता वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान ग्राहकांनाही बाजारपेठेत दर्जेदार आणि अस्सल पांढरा कांदा मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला विशेष ओळख प्राप्त होणार आहे. तसेच जीआयच्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणूक टाळता येणार आहे.


संतप्त शिवसैनिकांचा खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर धडक मोर्चा, घरात घुसण्याचा केला प्रयत्न


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -