घरमहाराष्ट्रटिटवाळ्यात रेल रोको, रुळांवर उतरून संतप्त प्रवाशांचे आंदोलन

टिटवाळ्यात रेल रोको, रुळांवर उतरून संतप्त प्रवाशांचे आंदोलन

Subscribe

टिटवाळा – मध्य रेल्वेवरील टिटवाळा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला होता. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. या रागातून संतप्त होत प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. ८.१९ ची लोकल प्रवाशांनी रोखून धरली होती. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवाशांना रुळावरुन बाजूला केले.

मुंबईकडून येणाऱ्या लोकल नियमित उशिराने येत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रुळावर उतरून रेल रोको केला. प्रवाशांनी १५ मिनिटे रेल्वे रोखून ठेवली होती. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेवरील गाड्या गेल्या काही दिवसांपासून उशिराने धावत आहेत. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांना लेट मार्क लागतो. नियमित लेट मार्क लागत असल्याने कर्मचारी संतप्त झाले होते. रेल्वे प्रशासनाने यात लक्ष घालून वेळापत्रकानुसार गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जातेय. त्यामुळे येत्या काळात रेल्वे प्रशासन प्रवाशांची मागणी ऐकते का हे पाहावं लागणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -