घरताज्या घडामोडीCSMTहून निघालेल्या एक्स्प्रेसचे डबे निखळले, प्रवाशांची उडाली तारांबळ

CSMTहून निघालेल्या एक्स्प्रेसचे डबे निखळले, प्रवाशांची उडाली तारांबळ

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)येथून बिदरकडे जाणाऱ्या सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसचे डबे काल(बुधवार) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास निखळले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. इंजिपासून जवळपास दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे डबे संपूर्ण गाडीपासून विलग झाले. काही फूट अंतरावर गेल्यानंतर हा प्रकार लोकोपायलटच्या लक्षात आला आणि त्यानंतर लोकोपायलटने तातडीने इंजिन थांबून गाडी थांबवली.

एक्स्प्रेसचे डबे कसे निखळले याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. डब्यांना जोडणारी नकल निघाल्याने डबे गाडीपासून वेगळे झाले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निखळलेले डबे सव्वा दहा वाजताच्या सुमारास बिदर एक्स्प्रेस गंतव्य स्थानकासाठी रवाना करण्यात आली. या अपघातामुळे रात्री उशीरा धावणाऱ्या जलद लोकल सुमारे पाऊण तासाहून अधिक काळ विलंबाने धावत होत्या.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर लांब पल्ल्यावर धावणाऱ्या मेल- एक्स्प्रेसची तपासणी करणाऱ्या रेल्वे विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


हेही वाचा : वरळी येथे लागलेल्या भीषण आगीत २ महिलांचा मृत्यू तर २ जण जखमी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -