घरदेश-विदेशRailway News : ऑनलाईन तिकीट कॅन्सलेशनच्या माध्यमातून रेल्वेची 2110 कोटींची कमाई; RTI...

Railway News : ऑनलाईन तिकीट कॅन्सलेशनच्या माध्यमातून रेल्वेची 2110 कोटींची कमाई; RTI मधून उघड

Subscribe

मुंबई – लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकांची पसंती ही रेल्वेला असते. रेल्वेचा प्रवास किफायतशीर आणि आरामदायी मानला जातो. मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेंची कमतरता हे शुक्लकाष्ट अजून संपलेले नाही. मात्र तिकीट रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असला तरी त्यातून रेल्वेने तब्बल दोन हजार कोटींची कमाई केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

उन्हाळ्याचे दिवस आहेत. अनेकांनी पर्यटन, कौटुंबिक सोहळे तसेच व्यावसायिक कामानिमित्त परगावी जाण्याचे प्लॅन तयार केलेले असतात. देशांतर्गत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वात सोयीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. मात्र सुटीच्या काळात दोन-तीन महिने आधीच रेल्वे बुकिंग फुल्ल असते. यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. तिकीट खिडकीवरुन रेल्वे तिकीट बुक केलेले असेल तर तिकीट रद्द करताना तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतात. मात्र आता सर्वकाही ऑनलाईन झालेले असताना रेल्वेच्या IRCTC वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जाते.IRCTCच्या माध्यामातून वेटिंग तिकीट बूक करणाऱ्यांना रेल्वेकडून मोठा भूर्दंड बसत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -
ऑनलाईन तिकीट कॅन्सलेशनच्या माध्यमातून रेल्वेची दोन हजार कोटींची कमाई

IRCTCची हजारो कोटींची कमाई 

IRCTCवर वेटिंग तिकीट बुक केल्यानंतर तुमचे सीट कन्फर्म झाले नाही तर रेल्वेकडूनच ते तिकीट रद्द केले जाते. मात्र या रद्द केलेल्या तिकिटाचा सर्व्हिस चार्ज ग्राहकाकडून वसूल केला जातो. उदाहरणार्थ 240 रुपये तिकीट दर असेल तर सर्व्हिस चार्जचे 180 रुपये कापले जातात. रेल्वेने 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात तब्बल 2110 कोटी रुपये तिकीट कॅन्सलेशन चार्जमधून कमावले आहेत. इंदू तिवारी यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला रेल्वे विभागाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

इंदू तिवारी यांनी रेल्वे विभागाला तिकीट कॅन्सलेशनमधून आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 दरम्यान किती महसूल जमा झाला याची महिती विचारली होती. त्यांच्या अर्जाला दिलेल्या लिखित उत्तरात सांगण्यात आले आहे की 2022-23 आर्थिक वर्षात 2109.74 कोटी रुपये, तर 2023-2024 आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 पर्यंत 1762.62 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

- Advertisement -
RTI Railway
तिकीट कॅन्सलेशनमधून 2022-23 आणि 2023-24 दरम्यान तब्बल 2110 कोटी रुपये महसूल जमा

रेल्वे विभागाने दिलेले हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेल्वेने या संबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रवाशांनी न केलेल्या प्रवासाठीचा हा भुर्दंड असल्याचे सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत. एवढी हजारो कोटींची कमाई होऊनही रेल्वे का वाढवल्या जात नाहीत असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. याकडे रेल्वे मंत्रालय केव्हा लक्ष देणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा : Suburban Local : पहिल्या रेल्वेला १७१ वर्ष पूर्ण ; लोकल प्रवाशांच्या नशिबी घुसमट, गर्दी, जीवघेणा प्रवास कायम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -