रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज रात्रीपासूनच मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहून घ्या!

देखभाल आणि अभियांत्रिकी कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज शनिवार रात्रीपासूनच मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी हे वेळापत्रक जरुर पाहुन घ्या.

मध्य रेल्वे

भायखळा – माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर
२० ऑगस्टच्या रात्री ११.३० ते २१ ऑगस्टच्या पहाटे ४.३० पर्यंत जलद मार्गावर
२१ ऑगस्टला सकाळी १२.४० ते ०५.४० पर्यंत डाउन जलद मार्गावर

२१ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०५.२० वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि ती नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचेल.

हेही वाचा – मोठी बातमी! २६/११ सारखा हल्ला करू, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा संदेश

ठाणे येथून २० ऑगस्ट रोजी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन

12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस,
11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि
12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोनदा थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून रविवारी सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) विभागात विशेष लोकल अंदाजे २० मिनिटांच्या वारंवारतेने धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वे

पश्चिम मार्गावरील बोरिवली ते कांदिवली येथे अप आणि डाऊन धीमा मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत धीम्या मार्गावरील फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.