घरताज्या घडामोडीrailway privatisation: रेल्वे खासगीकरणावर रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले १०० टक्के खासगीकरण....

railway privatisation: रेल्वे खासगीकरणावर रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले १०० टक्के खासगीकरण….

Subscribe

केंद्र सरकार देशातील रेल्वेचे खासगीकरण करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कंपन्या खासगीकरणासाठी काढल्या आहेत. यामध्ये रेल्वेचाही समावेश असल्याच्या चर्चा होत्या. परंतु रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे खासगीकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या देशातील अर्थव्यवस्था सुधारण्याची ताकद रेल्वेकडे आहे. परंतु रेल्वेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. खासगीकरणाबाबत कोणताही विचार नसून रेल्वेचे खासगीकरण होणार नाही असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात बोलताना रेल्वेच्या खासगीकरणाबाबत वक्तव्य केलं आहे. देशाची अर्थव्यवस्था रेल्वे सुधारु शकते परंतु अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी रेल्वेची सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना उत्तम सोयी आणि सुविधा मिळणे ही सरकारची पहिली प्राथमिकता आहे. तसेच शहरानुसार रेल्वे स्थानके उभारण्याची आवश्यकता आहे. प्रादेशिक संस्कृतीशी जोडून रेल्वे स्थानक बांधल्यास अधिक फायद्याचे होईल. सध्या एकूण ४० रेल्वे स्थानकांचा आराखडा तयार असून येत्या काही वर्षांत ते पूर्ण झालेली असतील असे वैष्णव यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

रेल्वे खासगीकरणाबाबतचा प्रश्न केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना विचारण्यात आला असता त्यांनी म्हटलं आहे की, रेल्वे खासगीकरणाचा आणि कोणत्या कंपनीकडे देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. १०० टक्के रेल्वेचे कधीही खासगीकरण कधीही होणार नाही. जगात सर्वच देशामंधील रेल्वे हे तेथील सरकार चालवत आहे. भारतातही केंद्र सरकार रेल्वे चालवणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये २०० ते ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  असा पंतप्रधान कधीही नसावा : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रझा यांचे मोदींवर टिकास्त्र

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -