रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा; स्थानक येण्यापूर्वी रेल्वेचा ‘हा’ अलार्म तुम्हाला उठवेल

रेल्वे (Indian Railway) प्रवासा करताना आता प्रवाशांची झोप पूर्ण होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी (Railway Passengers) अनोखी सुविधा सुरू केली आहे. लांबच्या प्रवासावेळी प्रवाशांना झोप लागते. त्यामुळे निश्चित स्थानकात उतरणे शक्य होत नाही.

रेल्वे (Indian Railway) प्रवासा करताना आता प्रवाशांची झोप पूर्ण होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी (Railway Passengers) अनोखी सुविधा सुरू केली आहे. लांबच्या प्रवासावेळी प्रवाशांना झोप लागते. त्यामुळे निश्चित स्थानकात उतरणे शक्य होत नाही. परिणामी त्यांना पुढच्या स्थानकात उतरावे लागते. मात्र आता रेल्वेने या प्रवाशांनी ‘डेस्टिनेशन अलर्ट’ची (Destination Alert) सुविधा सुरू केली आहे. या अलार्मनुसार, प्रवाशांना त्यांच्या निश्चिमस्थळी उठवण्याची जबाबदारी रेल्वे घेणार आहे.

रेल्वेच्या ‘डेस्टिनेशन अलर्ट’ या नव्या सुविधेनुसार, रेल्वे स्टेशन येण्याच्या २० मिनिटे आधी मोबाईलवर वेक-अप अलार्म (wake-up Alarm) पाठवून प्रवाशांना जागे केले जाणार आहे. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

या सुविधेसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार नसून, केवळ ३ रुपयांत ही सुविधा मिळणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा अधिक फायदा होणार आहे.

हेही वाचा – पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरळीत वाहतुकीसाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर

प्रवाशांच्या अडचणी आणि निर्माण होणारी गैरसोय दुर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. स्थानकातील गर्दीपासून ते रेल्वेमध्ये बसण्याच्या आसन व्यवस्थेत सुधारणा करेपर्यंत अनेक सुधारणा रेल्वेने केल्या आहेत. मात्र प्रवाशांच्या झोपेची समस्या अद्याप कायम होती, ही समस्याही आता रेल्वेने दुर केली आहे. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना बिनधास्त झोपता येणार आहे.

अशी मिळणार सुविधा

  • रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणारा कोणताही प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
  • या सुविधेसाठी प्रवाशाला मोबाईलवरून १३९ या आयआरसीटीसी (IRCTC) हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागेल.
  • कॉल केल्यानंतर प्रवाशाला भाषा निवडण्यासाठी पर्याय दिला जाईल.
  • वेकअप डेस्टिनेशन अलर्टसाठी ७ आणि नंतर २ हे आकडे दाबावे लागतील.
  • यानंतर प्रवाशाला त्याचा १० अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल.
  • पीएनआर क्रमांक भरल्यानंतर एक अंक दाबून त्याची पुष्टी करावी लागेल.
  • हे केल्यानंतर प्रवाशाचे इच्छित स्टेशन सेट केले जाईल.
  • त्यानंतर स्थानक येण्याच्या 20 मिनिटांपूर्वी अलर्ट मिळेल.

हेही वाचा – इंग्लंडच्या या खेळाडूचं सीमारेषेवर फलंदाजी करताना आपटलं डोकं; गंभीर दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर