घरमहाराष्ट्रपुढचे तीन दिवस राज्याच्या या भागांत होणार पाऊस, हवामान खात्याकडून शक्यता

पुढचे तीन दिवस राज्याच्या या भागांत होणार पाऊस, हवामान खात्याकडून शक्यता

Subscribe

पुणे – बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातही पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तीन दिवस राज्याच्या या भागात होणार पाऊस –

- Advertisement -

मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत बहुतांश भागात मुसळधार पवासने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कोकणात काही भागात मुसळधार पाऊस झाला. सध्या राज्यात हलका पाऊस होत असला, तरी पुढील तीन दिवसांत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या राज्यात होणार पाऊस –

- Advertisement -

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर ते धडकणार आहे. परिणामी या दोन्ही राज्यांसह तेलंगना, छत्तीसगड, सिक्कीम, पूर्व-मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे. या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -