ठाणे शहरात आज झाडांसंदर्भात तक्रारींचा पाऊस; ७ तासात ३० तक्रारी

ठाणे: एकीकडे पावसाने काही प्रमाणात उसंती घेत,आपली रिमझिम सुरू ठेवली असताना मात्र शुक्रवारी सकाळी साडेआठ ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या सात तासात झाडे कोसळणे, झाडांच्या फांदया तुटून पडणे असो या झाड धोकादायक झालेली आहेत. अश्या तब्बल ३० तक्रारी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत नोंदवल्या गेल्या आहे. यावरून पावसाच्या जोरापेक्षा झाडांच्या तक्रारींचाच जोर वाढल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.

गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ४५.१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचदरम्यान एकूण ३० तक्रारींची आपत्ती व्यवस्थापन कक्षेत नोंद झाली आहे. यामध्ये १५ झाडे पडण्याच्या, ०६ झाडांच्या फांद्या पडण्याच्या, ०४ धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या, ०१ पाणी साचण्याची तर ०४ इतर तक्रारी आहेत. त्यातच शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ठाणे शहरात अधून मधून बरसलेला पावसाची १०.६६ मिमी इतकी नोंद झाली आहे. तर दुसरीकडे याच सात तासात झाडांसंदर्भात तब्बल ३० तक्रारींसह एक खाडीत उडी मारली आणि दुसरी सरंक्षण भिंत पडली या अन्य दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

प्रत्येकी डझनभर झाडे व फांदयाच्या तुटून पडल्याच्या तक्रारी

सकाळपासून एकीकडे झाडांच्या फांदया पडत असताना, दुसरीकडे झाडे कोसळत असल्याचे समोर येत होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाडे असो या त्याच्या फांदया तुटून पडण्याच्या असो अश्या तब्बल १२-१२ तक्रारी एकामागून एक नोंदवल्या गेल्या. त्यातच सहा तक्रारी या झाडे धोकादायक झाली आहेत अश्याही दाखल झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.


हेही वाचा : ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी ‘ई’ विभागात एकाचवेळी ७ ठिकाणांहून निघाली प्रभातफेरी