गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतही पावसानं हजेरी लावली आहे. बुधवारपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये वरुणराजाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (Rain Update Heavy rains in Mumbai Heavy rain is expected in Pune Marathwada and Vidarbha)
देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 26 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबरच्या शेवटापर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर सप्टेंबरला संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागनं दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आस लावून बसलेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतही पावसानं हजेरी लावली आहे. बुधवारपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये वरुणराजाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
पावसाची तूट कायम
राज्यात 5 ऑक्टोबरनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाऊस परतणार असला तरी राज्यातील पाण्याची तूट भरून निघणं सध्यातरी अशक्यच दिसत आहे.
(हेही वाचा: देश अमृतकाळ साजरा करतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय, जयंत पाटील यांची टीका )