Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Rain Update : पुढील 5 दिवस राज्यातील हवामान 'असे' असणार, हवामान विभागाची...

Rain Update : पुढील 5 दिवस राज्यातील हवामान ‘असे’ असणार, हवामान विभागाची माहिती

Subscribe

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून विदर्भातील काही जिल्ह्यात आज अतिवृष्टीच्या होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात लावलेले हजेरी आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने पुन्हा जोर धरलेला पाहायला मिळत आहे, पण त्यातच आता हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील पाच दिवसांची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून विदर्भातील काही जिल्ह्यात आज अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला आहे. (Rain Update : Meteorological Department has given weather information for next 5 days in statRain Update : Meteorological Department has given weather information for next 5 days in state PPK)

हेही वाचा – Asia cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज होणार घोषणा; 15 खेळाडूंमध्ये कोणाला मिळणार संधी?

- Advertisement -

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये ओडिशा किनारपट्टीजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूरला ऑरेंज तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी वर्ध्यामध्ये 24 तासांत 148 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर गडचिरोलीमध्ये 125.4 मिमी, चंद्रपुरमध्ये 42 मिमी, नागपुरात 24 मिमी आणि बुलढाण्यात 14 मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, राज्यामध्ये पुढील 5 दिवस हे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -