Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला Orange अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला Orange अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस संतत धार ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान हा पाऊस लांबणार असून सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. देवघर घरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदीपात्रात येऊन नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी झाल्यास धरणामध्ये पूर्ण संचय पातळीपर्यंत कोणत्याहीक्षणी पाणीसाठा निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर धरण सुरक्षेततेच्या दृष्टीने अतिरिक्त येणारे पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे भाग आहे. नदीकाठच्या लोकांनी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बागळावी असे आवाहन, सं.ना. तळेकर, उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

या जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट

- Advertisement -

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. ८ सप्टेंबरला पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ९ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा : चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला, नारायण राणेंची ‘कोकण’वासीयांसाठी मोठी घोषणा


 

- Advertisement -