घरमहाराष्ट्रयेत्या चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

येत्या चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Subscribe

मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी १५ आणि १६ तारखेला मुसळधार पाऊसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राकडे येत असून १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढणार

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, १४ आणि १५ तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होणार असल्याचे सांगितले जात आहे. १६ तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.

- Advertisement -

हवामान खात्याचा अंदाज

मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी १५ आणि १६ तारखेला मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १४ तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


रुग्णांची लूट करणार्‍या खासगी रुग्णालयांना पालिकेचा दणका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -