घरताज्या घडामोडीविदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यात उकाडा

विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यात उकाडा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कारण राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कारण राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यानुसार, आज विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. (Rain warning Vidarbha while heat wave in rest of the state)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दोन दिवस पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे मुंबई व उपनगरे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, गोंदिया, वाशिम, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले असून आज विदर्भात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

याशिवाय, राज्यातील तापमानातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रस्ते निर्मनुष्य दिसू लागली आहेत. राज्यात कमाल तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा 15 ते 26 अंशांच्या दरम्यान आहे.


हेही वाचा – इंदूरच्या विहीर दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू; SDRF, NDRF, लष्कर आणि पोलीस दल तैनात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -