घरमहाराष्ट्रRaj & Shelar Meet : "मन की बात झाली"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर...

Raj & Shelar Meet : “मन की बात झाली”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलारांचे वक्तव्य

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका होताना दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मनसेच्या तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांच्यादृष्टीने भाजपा आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी आज भेट घेतली. या दोघांच्या भेटीवर आता आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. (Raj & Shelar Meet Maharashtra Politics Mann Ki Baat Jali Ashish Shelars statement after meeting Raj Thackeray)

हेही वाचा – Maharashtra Politics : रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर खैरे म्हणतात, उद्धव ठाकरे एकवचनी नेता

- Advertisement -

आशिष शेलार यांना माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंबरोबरच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, राजकारणात नेत्यांच्या भेटी होत असतात. मी आणि राज ठाकरे व्यक्तीगत आयुष्यात मित्र आहोत. तसेच राजकीय जीवनातही आमची मैत्री असल्यामुळे आम्ही भेटत असतो. अशा भेटींनंतर आम्ही साद घालायला गेलो होतो, वगैरे बोलण्यात काही अर्थ नाही आणि अशा आशयाच्या बातम्या दाखवण्यातही काही अर्थ नाही. या भेटीत मन की बात झाली, जन की बात झाली, महाराष्ट्र की बात झाली. अब बात चलेगी तो बहुत दूर तक चलेगी, असे आशिष शेलार यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता येत्या काळात मनसे महायुतीमध्ये सामील होणार का? हे पाहावे लागले.

भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मनसेबरोबरच्या युतीची चर्चा केली आणि आशिष शेलार वरिष्ठ नेतृत्वाचा हा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटले, अशा आशयाच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आल्या. याविषयी प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, मला वाटतं राजकारणात अशा भेटीगाठी होत असतात. नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होत असतात. अशा चर्चा झाल्या पाहिजेत. आमची व्यक्तीगत स्तरावरही चर्चा होत असते. या भेटीत काय झालं त्याचा खुलासा योग्य वेळी केला जाईल. मनसेचं शिष्टमंडळ अलीकडेच आलं होतं, काही गोष्टी आमच्याकडूनही होत्या. त्यामुळे आमच्यात आज भेट झाली, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : महाराष्ट्राची परिस्थिती पाकिस्तानसारखी होतेय; सुप्रीम कोर्टाने टीप्पणी केल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

देवेंद्र फडणवीसांसोबत सदीच्छ भेट

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीनंतर एका वृत्तवाहिनी प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले होते की, आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांना भेटायचे होते. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. आमची फक्त एक सदिच्छ भेट होती. यापुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेटी नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणे महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो, असे संदीप देशपांडे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -