घरमहाराष्ट्रअधिकाऱ्यांच्या संगनमताने मला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या प्रकरणात अडकवले, राज कुंद्राची सीबीआयकडे तक्रार

अधिकाऱ्यांच्या संगनमताने मला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या प्रकरणात अडकवले, राज कुंद्राची सीबीआयकडे तक्रार

Subscribe

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने केंद्रीय अन्वेषण विभागा (CBI)कडे तक्रार केली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात गोवले होते, असा दावा राज कुंद्रांनी तक्रारीत केला आहे. माझ्याविरुद्ध दाखल प्रकरणाचा सीबीआयने पुन्हा तपास करावा, जेणेकरुन मला न्याय मिळेल, अशी मागणी आता राज कुंद्राने केली आहे.

राज कुंद्राची तक्रार काय –

- Advertisement -

आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला हा एका प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने तयार केला होता. यासाठी त्याने मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला कथित पॉर्नोग्राफी रॅकेटच्या खोट्या प्रकरणात अडकवलं आणि अटक केली,” असंही कुंद्राने तक्रारीत म्हटलं आहे. माझ्याविरुद्ध दाखल याच प्रकरणाचा सीबीआयने पुन्हा तपास करावा, जेणेकरुन मला न्याय मिळेल, अशी मागणी आता राज कुंद्राने केली आहे.

 पॉर्नोग्राफीच्या निर्मितीशी काहीही संबंध – राज कुंद्रा

- Advertisement -

आपला पॉर्नोग्राफीच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही किंवा त्यांनी त्यातून कोणतेही पैसे कमावले नाहीत. हॉटशॉट अॅप माझ्या मेहुण्याचे होते आणि ते अॅप अश्लील नव्हते, असे राज कुंद्राकडून सातत्याने सांगितले जात होते. तसेच ज्यावर ओटीटी अॅप चालू शकतात फक्त तेच सॉफ्टवेअर त्याच्या कंपनीने दिले होते. पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोणत्याही आरोपींशी आपला काहीही संबंध नाही. मुंबई पोलिसांनी 17 अॅप्सविरोधात एफआयआर दाखल केला होता. मात्र, इतर कोणालाही हायलाईट करण्यात आले नाही, केवळ यातून बदनामी केली गेल्याचा दावाही कुंद्राने केला आहे.

क्राईम ब्रान्चमधील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप –

राज कुंद्राने तक्रारीत मुंबई क्राईम ब्रान्चमधील काही अधिकार्‍यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात दाखल केलेल्या पहिल्या 4 हजार पानांच्या आरोपपत्रात आपले नाव नसतानाही, पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात अडकवण्यासाठी सर्व काही केले. या खटल्यातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा उल्लेख राज कुंद्राने तक्रारीत केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबत साक्ष देतील अशा अनेक साक्षीदारांचे तपशील आपण शेअर करु शकतो, असे राज कुंद्राने सीबीआयला तक्रारीत म्हटले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -