घरताज्या घडामोडी'एकही रुग्ण दगावला नाही, मग उगाच बाऊ का'? राज ठाकरेंचा सवाल

‘एकही रुग्ण दगावला नाही, मग उगाच बाऊ का’? राज ठाकरेंचा सवाल

Subscribe

'महाराष्ट्रात एकही रुग्ण दगावला नाही, मग उगाच बाऊ का करत आहे'? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी मनसे सज्ज झाली असून बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल देखील झाले आहेत. तसेच यानिमित्ताने मनसेचा कार्यक्रम आणि शोभा यात्रा देखील होणार आहेत. याबाबत पत्रकरांनी राज ठाकरे यांना विचारले की, एकीकडे करोना व्हायरसच्या भितीमुळे गर्दीचे कार्यक्रम रद्द केले जात आहेत. त्यावर राज ठाकरे म्हणले की, ‘राज्यात एकही रुग्ण दगावला नाही, मग उगाच बाऊ का’?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की. ‘महाराष्ट्रात करोनामुळे एकही रुग्ण दगावलेला नाही. राज्याचे प्रशासन उगाच लोकांना घाबरवत आहेत. त्यामुळे का एवढा बाऊ केला जात आहे ते कळत नाही. आपल्याकडे एवढ्या मोट्या प्रमाणात करोनाच्या केसेस नाही जो काही आव आणला जात आहे. हे काही योग्य नाही. महाराष्ट्रात एकही रुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे एवढे घाबरुन जाण्यासारखे काही नाही. काळजी घेणे हे प्रत्येकाचे काम आहे यात दुमत नाही’, मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘करोना’ बाधीतांची नावे फोडणाऱ्यांवर होणार कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -