Thursday, June 17, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग राज ठाकरेंचे पुण्याचे 'वैशाली' कनेक्शन

राज ठाकरेंचे पुण्याचे ‘वैशाली’ कनेक्शन

Related Story

- Advertisement -

आज दिवसभर सोशल मिडियावर पुण्याच्या एका व्यक्तीचा फोटो दिवसभर व्हायरल होतोय. या फोटोच्या निमित्ताने ज्याला हा माणूस माहितेय तोच खरा पुणेकर अशी फोटोओळही देण्यात आली आहे. तर आणखी एका वाक्यात म्हटले आहे की, मी त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा हा माणूस मला बोलावून सांगेल, ” त्या टेबल वर !” या सगळ्या खटाटोपाच निमित्त इतकच की, पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट हे कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद आहेत. त्यामुळेच पुणेकरांमध्ये प्रसिद्ध आणि आवडीच्या अशा वैशाली रेस्टॉरंटमध्ये असणारी वर्दळ गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. वैशालीमध्ये बसण्याचे ठिकाणी सांगणाऱ्या व्यक्तीचा फोटो हे त्याचेच कारण आहे. अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेतेमंडळींमध्येही या रेस्टॉरंटबाबतचे आकर्षण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही एका पत्रकार परिषदेत पुण्यातील याच वैशाली रेस्टॉरंटचा उल्लेख झाला होता. त्याचाच एक भन्नाट किस्सा आहे.

vaishali restaurant

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवडत्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे खाण्याची आवड. वेगवेगळ्या शहरातील खास पदार्थांना आवर्जून वेळ काढून भेट देताना त्यांच्यातली खवय्यैगिरीचे दर्शन हे झाले आहे. मग ठाण्यातील मामलेदारची मिसळ असो वा पुण्यातला वैशाली हॉटेलमध्ये त्यांच्या आवडीचा डोसा. पुण्यातल्या दौऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्याकडून एका पत्रकार परिषदेतही या वैशालीच्या डोसाचा उल्लेख झाला होता. तर ठाण्यातील मामलेदार मिसळही याआधीच्या २०१९ च्या निमित्ताने चर्चेत आली होती जेव्हा राज ठाकरे यांनी एका सभेनंतर त्याठिकाणी भेट दिली होती.

vaihsali restaurant Raj Thackeray

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवडीपैकी वाचन, चित्रपट, व्यंगचित्र या गोष्टी आहेत, तशीच आणखी एक आवडती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन आपल्या आवडीचा पदार्थ खाण्याची आवड. राज ठाकरे जेव्हा पुण्यात मित्रांना भेटायला जातात, तेव्हा त्यांच्या आवडीचे एक ठिकाण म्हणजे एफ. सी. रोडवर असणारे वैशाली रेस्टॉरंट. मनसे २०१२ जेव्हा एन फॉर्मात होती तेव्हा राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने खूपच चर्चा होत होती. त्याचवेळी राज ठाकरे यांच्याकडूनच एका पत्रकार परिषदेत या वैशाली रेस्टॉरंटचा उल्लेख झाला होता. ११ फेब्रुवारी २०१२ रोजी राज ठाकरे यांनी या रेस्टॉरंटला भेट दिली होती. राज ठाकरेंना मित्रांसोबत डोसा खायला आवडत असला तरीही, त्यादिवशी राज ठाकरे यांनी मेदूवडा, टोमॅटो ऑनियन उथ्थपा आणि साबुदाणा वडा ऑर्डर केला होता. त्यासोबतच एक बिना सारखेची कॉफीही त्यांनी ऑर्डर केली. राज ठाकरेंसोबतच २० पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या वैशाली भेटीमध्ये सोबत होते. त्यामुळेच दुपारी २.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या वैशाली डिप्लोमसीमध्ये रेस्टॉरंटमध्ये विशेष अशी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी बेळगावच्या वादात महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील मराठी लोकांच्या मुलांना शाळेत मराठी शिकावे लागत असल्याबाबत भाष्य केले. त्यानंतरच पुण्यातल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी पुणे दौरा केला होता.

Raj thackeray vaishali

राज ठाकरे आणि वैशाली कनेक्शन हे २०१२ च्या दौऱ्याच्या १५ वर्ष आधीचे त्यावेळी होते. पुण्यात गाठीभेटींसाठी राज ठाकरे याच रेस्टॉरंटमध्ये भेटी देतात. वैशालीमध्ये टेरेसवर त्यांची आवडीची अशी जागा आहे. ज्याठिकाणी मित्रांसोबत बोलताना त्यांना थोडी प्रायव्हसी मिळते म्हणूनच त्यांच्या आवडीच्या ठिकाणीपैकी एक वैशाली रेस्टॉरंट आहे. जेव्हा २०१२ मध्ये राज ठाकरे पुणे दौरा करणार होते, तेव्हा रेस्टॉरंटलाही याबाबतची कल्पना देण्यात आली होती. त्यांनी या भेटीदरम्यान उडीद वडा, साबुदाणा वडा, टोमॅटो ऑनियन उत्तपा, आणि कॉफी विदाऊट शुगर असा तगडा ब्रेकफास्टही केला.

 


 

- Advertisement -