घरताज्या घडामोडीचिंता करु नका, आपण पाठपुरावा करु, राज ठाकरेंचे पोलीस कुटुंबीयांना आश्वासन

चिंता करु नका, आपण पाठपुरावा करु, राज ठाकरेंचे पोलीस कुटुंबीयांना आश्वासन

Subscribe

स्थलांतर करण्यात येणारी जागा सध्याच्या जागेपेक्षा खराब

दादर येथील नायगाव पोलीस वसाहतमधील इमारत धोकादायक असल्यामुळे तेथील पोलीस बांधवांना घरं खाली करण्याची नोटीस राज्य सरकारने पाठवली आहे. मात्र पोलीस कुटुंबीयांनी घरं खाली करण्यास नकार दिला आहे. या वसाहतीतील नागरिकांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. तसेच पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली आहे. राज ठाकरे यांनी चिंता करु नका याचा आपण पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे. नायगावमधील पोलीसांचे कुटुंबीय राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते.

नायगाव पोलीस वसाहतमधील पोलीस कुटुंबीयांना घर खाली करण्यासाठी सांगितल्यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला आहे. घरं सोडून कुठे जायचं असा प्रश्न या कुटुंबीयांकडून विचारण्यात येत आहेत. पोलीस वसाहतीमधील इमारती जुन्या झाल्या असल्यामुळे धोकादायक झाल्या आहेत. यामुळे तेथील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्थलांतर करण्यात येणारी जागा सध्याच्या जागेपेक्षा खराब असल्याची माहिती पोलीस बांघवांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती कुटुंबीयांनी सांगितली आहे. राज ठाकरे यांनी कुटुंबीयांच्या व्यथा ऐकून घेत याबाबत पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

फडणवीस यांचे आश्वासन

पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांनी घरं खाली करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच राज्य सरकारविरोधात निदर्शनंही केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नायगाव वसाहतीमध्ये जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली तसेच एका इमारतीची पाहणीही केली आहे. यावेळी या इमारती धोकादायक नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच तात्काळ रहिवाशांच्या घरी खाली करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावे अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्य सरकारने कालिदास समितीच्या आराखड्यावर विचार करावा असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -