घरताज्या घडामोडीमुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे, राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावरून प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून सुरू झालं. तसेच मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे, असं म्हणत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

जातीच्या राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरु झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाही. याबाबत मी त्यांना मुलाखतीत सुद्धा विचारलं होतं. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार नव्हता का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

- Advertisement -

मूळ विचार हा शिवरायांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचं. तसेच इतर समाज आणि मराठा समाजामध्ये जास्तीत जास्त फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा, असं म्हणत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

- Advertisement -

शिवाजी महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्या ग्रंथात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. या ग्रंथाव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरे कोणतेही दाखले किंवा पत्र नाहीत. त्यामुळे यातूनच काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहचावा लागतो, असंही राज ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : मुख्यमंत्री होणारी महिला घरातील की बाहेरची?, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -