मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून रवींद्र धंगेकरांना रसद, राज ठाकरेंचा मोठा निर्णय

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजपकडून जंगी प्रचार केला जात आहे. भाजपने कसब्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. याशिवाय भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळाला आहे. परंतु मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना रसद पुरवण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पुण्यात पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहे.

आज बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत पुण्याच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला मदत होणार नाही, याची काळजी घ्या, जास्तीत जास्त भाजपला मतदान करण्यासाठी कामाला लागा. मनसे उघडपणे प्रचारात उतरणार नाही. मात्र मनसेची 100 टक्के मदत ही भाजपला व्हायला हवी, अशा सूचना नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत राज ठाकरेंच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांढांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे हे पक्षविरोधी काम करताना आढळून आल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : भस्म्यारोग झालेल्यांना शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची आहे, भास्कर जाधवांचा हल्लाबोल