Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सामान्य माणसासारखा जगणारा सुपरस्टार; राज ठाकरेंनी केलं रजनीकांत यांचं कौतुक

सामान्य माणसासारखा जगणारा सुपरस्टार; राज ठाकरेंनी केलं रजनीकांत यांचं कौतुक

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज ठाकरेंनी रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.

Related Story

- Advertisement -

दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार रजनीकांत यांना सीनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातून रजनीकांत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रजनीकांत यांचं कौतुक केलं आहे. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत रजनीकांत यांचं अभिनंदन केलं.

“रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन,” असं राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न…

Posted by Raj Thackeray on Thursday, 1 April 2021

रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३ मे रोजी रजनीकांत यांचा ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.

- Advertisement -

A heartfelt appreciation and congratulations to rajnikant from mns

- Advertisement -