घरमहाराष्ट्रमातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आलेल्यांबरोबर तुम्ही जेवताय?, राज ठाकरेंचा राऊतांना टोला

मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आलेल्यांबरोबर तुम्ही जेवताय?, राज ठाकरेंचा राऊतांना टोला

Subscribe

महाराष्ट्रात रेल्वे भरती असताना त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत होत्या. महाराष्ट्रात हजारो बेरोजगार तरुणतरुणी आहेत. महाराष्ट्रामध्ये भरती असेल तर संधी महाराष्ट्रातल्या लोकांना मिळायला हवी, यूपी बिहारमध्ये संधी असेल, तर तिथल्या लोकांना संधी मिळावी. त्यानंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायला लावल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

पुणेः मी सांगितलं मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा. राणा दाम्पत्य उठलं आणि त्यांनी हनुमान चालिसा मातोश्रीवर म्हणण्याचा हट्ट केला. अरे मातोश्री काय मशिद आहे का? त्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे, त्यानंतर एकत्रं आले. मग त्यांना सोडण्यात आलं. सेनेकडून वाटेल ते बोलण्यात आलं. तेही बोलले. एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि राऊत जेवताना दिसले. शिवसेनेतील पदाधिकारी लोकांना काही वाटतच नाही. जे लोक मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आलेत. तिकडे त्यांच्याबरोबर जेवताय, फिरताय हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर केली. पुण्यातील गणेश कला क्रीडामध्ये मनसेची सभा झाली, त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. आमचं खरं हिंदुत्व आणि त्यांचं खोटं हिंदुत्व, खरं हिंदुत्व काय आहे, त्याचे रिझल्ट पाहिजेत, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो, उत्तर प्रदेश, बिहार जे बोलतायत, आंदोलन झालं होतं, महाराष्ट्रात रेल्वे भरती होती, तेव्हा हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या स्टेशनांवर उत्तर प्रदेश आणि बिहारची मुलं आली होती. तिथे बोलताना एका मुलानं आपल्या पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. त्यानंतर सगळा राडा झाला. महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती आहे, याची महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती नाही, त्याची भरती महाराष्ट्रातल्या पेपरमध्ये नाही. महाराष्ट्रात रेल्वे भरती असताना त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत होत्या. महाराष्ट्रात हजारो बेरोजगार तरुणतरुणी आहेत. महाराष्ट्रामध्ये भरती असेल तर संधी महाराष्ट्रातल्या लोकांना मिळायला हवी, यूपी बिहारमध्ये संधी असेल, तर तिथल्या लोकांना संधी मिळावी. त्यानंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायला लावल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

- Advertisement -

मी भाषणाला सुरुवात करण्याअगोदर मगाशी एका वृत्तवाहिनीवरती आलेली क्लिप मला कोणी तरी दाखवली आजच्या या भाषणासाठी म्हणून आपल्या पुण्यातले काही अंध विद्यार्थी आलेले आहे, असं मला कळलेय, त्यांना सांभाळून व्यासपीठावरती घेऊन या. एसपी कॉलेजच्या लोकांनी सभेसाठी नकार दिला, आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही. मग काय नदीपात्राचा विषय झाला. हवामान पाहता कोणत्याही वेळेला पाऊस पडेल अशी चिन्हे दिसतायत. निवडणुका नाहीत, मग काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करा. मग मी यांना सगळ्यांना सांगितलं, गणेश कला क्रीडा सभा घेऊ, निवडणुकांना वेळ आहे. त्या दिवशी मी पुण्यात आलो, पुण्यात आल्यानंतर थोडंसं माझं पायाचं दुखणं चालू आहे. त्या पायामुळे कमरेचं दुखणं चालू होतं. त्यामुळे 1 तारखेला हिकबोनचं ऑपरेशन करणार आहे. पत्रकारांनी उगाच नको तो अवयव बाहेर काढण्याआधी म्हटलं आपणंच सांगावं, कोणत्या अवयवाचं ऑपरेशन आहे ते.. कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तर कोणकोणते अवयव बाहेर काढतील सांगता येत नाही, असंही राज ठाकरे म्हणालेत.


हेही वाचाः …म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘कारण’

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -