Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : टॅक्स भरला, विषय संपला; ईडीच्या नोटीसीबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच...

Raj Thackeray : टॅक्स भरला, विषय संपला; ईडीच्या नोटीसीबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

Subscribe

वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज गुरुवारी (ता. 30 जानेवारी) मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातून राज ठाकरेंनी त्यांना आलेल्या ईडी नोटीसीबाबतचे खरे कारण सांगितले आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मिळाली, म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, अशी चर्चा लोकसभा निवडणुकीत आणि त्याच्याआधी सुद्धा अनेकदा राजकारणात होत होती. पण या चर्चांना आणि होणाऱ्या टीकांना आता अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. त्यांना ईडीची नोटीस नेमकी का आणि कोणत्या कारणामुळे आली होती? याबाबतचा खुलासा पहिल्यांदा राज ठाकरेंनी केला आहे. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज गुरुवारी (ता. 30 जानेवारी) मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातून राज ठाकरेंनी त्यांना आलेल्या ईडी नोटीसीबाबतचे खरे कारण सांगितले आहे. (Raj Thackeray disclosed for the first time about the ED notice)

ईडी नोटीसीबाबतची कहाणी सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराजांच्यासमोर त्यांची शपथ घेऊन सागंतो… 2005 ची गोष्ट आहे. शिवाजी पार्क परिसरात लहानाचा मोठा झाल्याने मी लहानपणापासून कोहिनूर मिल पाहात होतो. एके दिवशी कोहिनूर मिलची बातमी वाचली. तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता. बातमी होती, एनटीएससीच्या मिल्स काढा. जे काही कामगारांची देणी असेल ती देऊन टाका, असे म्हणत कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले होते. जी बातमी मी वाचली त्यामध्ये कोहिनूर मिलचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता. मी लगेच माझ्या पार्टनरला फोन केला. पण सहकाऱ्याने सांगितले की हे प्रकरण मोठे आहे. मी म्हटले आपण चेक करू. मी दुसऱ्या सहकाऱ्याला फोन केला. त्यांना म्हटले, बघा काय होते. आम्ही आकडेवारी केली, टेंडर भरले. त्यानंतर एकेदिवशी पार्टनरचा सकाळी घाबरत फोन आला. त्याला मी म्हटले काय झाले. तर म्हणाला की, टेंडर लागले. ते 400 ते 500 कोटीचे टेंडर होते. म्हटलं, एवढे पैसे आणायचे कुठून. त्यावेळी माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण तसे दाखवले नाही, असा किस्सा राज ठाकरेंकडून सांगण्यात आला.

हेही वाचा… Raj Thackeray : हल्ली आपल्याकडे सर्वच इतिहासतज्ज्ञ, छावा चित्रपटावरून राज ठाकरेंचा टोला

यानंतर आमच्या दुसऱ्या मित्राला सांगितले. त्याने एक आयएल अँड एफएस नावाची कंपनीसोबत संपर्क केला. ती कंपनी म्हणाली की, आम्ही पैसे भरायला तयार आहोत. सर्व पैसे त्या कंपनीने भरले होते. आम्ही सात ते आठ जण पार्टनर होतो. सर्व सुरू झाले, पण त्यात ब्रेक आला. केस कोर्टात गेली. दीड वर्ष गेले, त्यानंतर पुन्हा काम सुरू झाले. मी सहकाऱ्याला म्हटले हा पांढरा हत्ती आहे, झेपणार नाही, आपण बाहेर पडूया. माझ्या तर सहकाऱ्यांनीही दुजोरा दिला, म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन त्यातून बाहेर पडलो. ही 2008ची गोष्ट आहे. त्यानंतर आमचा विषय संपला. पण ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, तेव्हा मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस? का आली? पण नंतर कळलं की त्यात कोहिनूरचा विषय होता. आमचा काय संबंध म्हणून ईडीच्या लोकांशी बोललो, पण ते लोक काय बोलत होते ते कळत नव्हते. पण या प्रकरणात जे पैसे आले. त्यावर टॅक्स भरला आणि गेला. त्या कंपनीनेही टॅक्स भरला. आम्ही त्यातून बाहेर पडलो. ती गोष्ट आली तेव्हा सीएला बोलावले. त्याला विचारले काय झाले. तो म्हणाला, तुमच्या एका पार्टनरने हा टॅक्स भरलाच नाही. त्याने बाहेरच्या बाहेर ते पैसे वापरले होते, अशी माहिती समोर आली.

त्यानंतर मी सीएला विचारले की आता काय करायचे ? तर तो म्हणाला की, आता परत टॅक्स भरायचा. आम्ही परत सगळ्यांनी आपापला टॅक्स भरला, उगाच त्या झंझटीत कोण जाईल? त्यामुळे टॅक्स भरून तिथेच तो विषय संपला, असा खुलासा यावेळी राज ठाकरेंकडून करण्यात आला. पण आता एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे मोदींना घाबरला आणि स्तुती करायला लागला? मला काय घेणे देणे त्यांच्याशी. माझ्या डोक्यावर तलवार घेऊन नाही मी फिरत असे सांगत राज ठाकरेंनी ईडी नोटीसीची माहिती देत आपण भीतीपोटी आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे पक्षाच्या मेळाव्यातून स्पष्ट केले.

हेही वाचा… Raj Thackeray : लोकांनी मते दिली पण आपल्यापर्यंत आली नाही, विधानसभा निकालाबाबत राज ठाकरेंचा संशय