राज ठाकरे संतापले; गद्दारांची २ दिवसांत पक्षातून करणार हकालपट्टी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी कानउघाडणी केली आहे. गद्दारांना माझ्या पक्षात स्थान नाही, दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

raj thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी सगळ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. आपल्या पक्षातच काही गद्दार कार्यकर्ते आहेत, जे विश्वासघात करत आहेत. दोन वेगवेगळे चेहरे घेऊन ते वावरत आहेत. मीडियाला चूकीच्या बातम्या देतात. या गद्दार लोकांची नावे मला कळली असून लवकरच त्या लोकांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

२ दिवसांत पक्षातून हकालणार

पक्षाच्या संघटन बांधणीसाठी राज ठाकरे जोरात तयारी करत आहेत. कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. मात्र काही लोक चुकीच्या बातम्या देऊन पक्षाचे नुकसान करत आहेत. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान नाही. काही जण मुद्दामहून पक्षाची बदनामी करत असून चुकीच्या बातम्यांमुळे राज ठाकरे चिडले होते. गद्दारांनी माझ्या सभेतूनदेखील बाहेर जावे, अशा लोकांची नावे मला कळाली आहेत, त्यामुळे त्यांच्यावर लवकरच कारवाई करेन, असे कार्यकर्त्यांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले.

निवडणूकीसाठी ५ सदस्यीय समितीची स्थापना

औरंगाबाद महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. निवडणूकीची रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टिने ही महत्वाची बैठक होती. राज ठकरे यांनी महापालिका निवडणूकीसाठी ५ सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीवर निवडणूक प्रचार, त्यातले मुद्दे, पक्षप्रवेश, आश्वासन याबद्दलचे निर्णय घेण्याची जवाबदारी असे.