‘तो’ व्हिडीओ पाहून राज ठाकरे झाले भावूक; म्हणाले, “माहीत नाही, कोणीतरी विष कालवलं की…”

संगीतकार, गायक असलेले अवधुत गुप्ते यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा पहिला भाग पुढील महिन्यात 4 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाच्या पहिल्या भागातच सगळ्यांना राज ठाकरे यांची मुलाखत पाहायला मिळणार आहे.

Raj Thackeray got emotional after seeing 'that' video

संगीतकार, गायक असलेले अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा पहिला भाग पुढील महिन्यात 4 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाच्या पहिल्या भागातच सगळ्यांना राज ठाकरे यांची मुलाखत पाहायला मिळणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो हा प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर देखील तो व्हायरल करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची चर्चा तर सर्वत्र करण्यात येतच आहे. पण सर्वाधिक चर्चा होतेय, ती म्हणजे राज ठाकरेंच्या मुलाखतीची आणि मुलाखतीच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या व्हिडीओची. (Raj Thackeray got emotional after seeing ‘that’ video)

हेही वाचा – अनोखा विवाह सोहळा: लेकीच्या लग्नात पित्यानं वऱ्हाडींना वाटली वडाची झाडं अन् बियाणे

‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आलेली आहे. या मुलाखतीत त्यांना उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा काही फोटो दाखवण्यात आले. यावेळी अवधूत गुप्ते यांनी राज यांना प्रश्न विचारला की, “कायं वाटतं हे सगळं एकत्र पाहून?” या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला, कोणीतरी विष कालवलं की नजर लावली.” पण हे उत्तर देताना राज ठाकरे हे भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच सर्वांना या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची उत्सुकता लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याबाबत कमेंट केलेल्या आहेत. या दोन्ही भावांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे, असे मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण हे दूषित झाले आहे. ज्यामुळे ठाकरे बंधूंची महाराष्ट्राला गरज आहे. हे दोघेही एकत्र आले तर महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणचीच हिंमत होणार नाही, असे मत सर्वसामान्यांनकडून व्यक्त करण्यात येत आहे. पण आता या प्रोमोमुळे काही तरी चांगले व्हावे, तसेच हे दूर गेलेले भाऊ एकत्र येण्याची काही शक्यता आहे की नाही, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.