घरमहाराष्ट्रदसरा मेळाव्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला होता 'हा' सल्ला, मनसे नेते प्रकाश...

दसरा मेळाव्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला होता ‘हा’ सल्ला, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा दावा

Subscribe

मुंबई – दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गट या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिल्याचे सांगीतले

राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंना दिला होता हा सल्ला –

- Advertisement -

मेळाव्याबाबत कोणीही राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंनी दिला होता. तसेच दसरा मेळावा आणि शिवसेना हे एक समीकरण असून, त्यात आपण पडू नयेत असा सल्लाही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिला होता, असे मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले आहे.

दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण  –

- Advertisement -

जेव्हा दसरा मेळाव्याचा विषय निघाला त्यावेळी आमच्या पक्षातील सुद्धा काही तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, राज ठाकरेंनी सुद्धा दसरा मेळावा घ्यावा. विशेष म्हणजे राज ठाकरेंना हे सांगण्याची जवाबदारी त्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर टाकली. त्यामुळे याबाबत मी राज ठाकरे यांना विचारले. तेव्हा यावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, वर्षोनुवर्षे दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. त्यामुळे या समीकरणात आपण जाणे म्हणजे कुंतेल पणाच लक्षण ठरेल. त्यामुळे हे समीकरण असेच राहिले पाहिजे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असे राज ठाकरे मला म्हणाले होते, असेही प्रकाश महाजन म्हणाले. तर असाच सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा दिल्याचे महाजन म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -