घरमहाराष्ट्रपुणेRaj Thackeray : "माझ्या हातात काही द्यायचे नाही...", राज ठाकरेंची बॅडमिंटन खेळाडूंसमोर राजकीय फटकेबाजी

Raj Thackeray : “माझ्या हातात काही द्यायचे नाही…”, राज ठाकरेंची बॅडमिंटन खेळाडूंसमोर राजकीय फटकेबाजी

Subscribe

पुणे : बॅडमिंटन खेळाडूंसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी बॅडमिंटन खेळतानाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मला एका गोष्टीचे फार नवल वाटते की, माझ्या हातात काही द्यायचे नाही. पण अपेक्षा माझ्याकडून ठेवायच्या. एकदा तुम्ही माझ्या हातात सगळे द्या, मग तुम्ही बघा मी कसा हाणतो, अशी राजकीय टीप्पणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरे म्हणाले,हे काही राजकीय व्यासपीठ नाही. बॅडमिंटनवर माझे नितांत प्रेम आहे. जवळपास 15 ते 20  वर्षे मी बॅडमिंटन खेळलोय. एखाद्या गोष्टीचे व्यसन असावे, तरमी बॅडमिंटन खेळलो आहे. सकाळी सहा-साडेसात वाजता बॅडमिंटन खेण्यासाठी जायचो आणि रात्री 11-12 वाजता घरी जेवायला येत होतो. मी बॅडमिंटन सोडले आणि टेनिस सुरू केले, असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Shahu Maharaj: छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या रणांगणात; 2024 ची लोकसभा लढवणार?

राज ठाकरे म्हणाले, “हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर माझे वजन वाढले. दीड – पावणे दोन वर्षे व्यायाम वगैरे काही नव्हते. त्यामुळे टेनिस सुटले. पण आता टेनिस खेळणे सुरू झालेले आहे. मला कल्पना नाही की, पुण्यात बॅडमिंटनसाठी काय करू शकतो. तुम्ही मला सांगात आपण निश्चित पुण्यासाठी ती गोष्ट करू. बॅडमिंटनसाठी मला जे जे करता येईल, मी निश्चित पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी करेन. कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बॅडमिंटनला पुन्हा गेम म्हणायचे. पण पुण्यात सध्या काय गेम सुरू, याबद्दल मला माहिती नाही. पण ज्यांचे गेम सुरू आहेत. त्यांना काही सांगू उपयोग नाही. कारण दिसली जमिनी की विक जे धोरण घेऊन जे लोक पुढे जातात. त्या लोकांना जर बॅडमिंटनचे कोर्ट दाखविले तर, ही जमिनी मोकळी का? असे ते विचारू शकतात. त्यामुळे बॅडमिंटनपेक्षा कॅरम का खेळत नाही हे ते विचारू शकतात? हे ते सुचवू शकतात”, असाही उपहासात्मक टोला राज ठकारेंनी राजकीय नेत्यांना लगावला.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -